शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा 'कोरोना पॉझिटिव्ह'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 17:23 IST

Kolkata news: जर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

ठळक मुद्देभाजपाचे नेते अनुपम हाजरा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी अनुपम हाजरा यांची कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जर मला कोरोनाची लागण झाली, तर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, जेणेकरुन त्यांना कोरोना रूग्णांच्या कुटुंबीयांच्या वेदना समजतील, असे वादग्रस्त विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

देशभरात कोरोनाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी हजारोंच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते किंवा सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत होते. याबाबत पत्रकारांनी अनुपम हाजरा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर अनुपम हाजरा म्हणाले होते की, आमचे कार्यकर्ते कोविड-१९ पेक्षा खूप धोकादायक आव्हानाशी लढत आहेत, ते ममता बॅनर्जी यांच्याशी लढत आहेत. कारण त्या कोविड -१९ महामारीमुळे प्रभावित नाहीत आणि त्यांना कोणाची भीती नाही असे त्यांनी सांगितले होते. याशिवाय, जर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे विधान अनुपम हाजरा यांनी केले होते.

अनुपम हाजरा तृणमूल काँग्रेसमध्ये होतेअनुपम हाजरा याआधी तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार होते. गेल्या वर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने आता राहुल सिन्हा यांच्या जागी अनुपम हाजरा यांची  राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. अनुपम हाजरा म्हटले होते की, राज्यात कोविड -१९ रुग्णांच्या पार्थिवावर ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जात आहेत, ते दुःखद आहे. या महामारीच्या कोरोना पीडितांना अत्यंत चुकीची वागणूक दिली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह रॉकेलने जाळले आहेत. आम्ही अशाप्रकारचे कृत्य कुत्रा किंवा मांजरीसोबतही करत नाही, असे अनुपम हाजरा यांनी म्हटले होते.

तृणमूल नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होताममता बॅजर्जी यांच्याबाबत केलेल्या या विधानावरुन तृणमूल काँग्रेसने अनुपम हाजरा यांच्यावर निशाणा साधत ते मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असल्याचे म्हटले होते. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, हे विधान तो व्यक्ती करु शकतो जो वेडा आणि अपरिपक्व आहे. जो मानसिकदृष्ट्या बघत असेल तो अनुपम हाजरा यांचे विधान ऐकेल त्याला समजेल की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल