शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 23:37 IST

BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दाखले देत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे.

BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह अनेक पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी यावर प्रतिक्रिया देताना नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली. यानंतर आता या निर्णयावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. 

सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र आमच्या काही मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे सरकारने आम्हाला तारीख सांगावी. जातिनिहाय जनगणना कधी सुरू करणार व अंतिम अहवाल कधी सादर करणार याची तारीख आम्हाला सांगायला हवी. सरकारने जातिनिहाय जनगणनेला उशीर केला असला तरी हे काम आता तातडीने व्हायला हवे. या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे आम्ही स्वागत करतो. सरकारने आमचे स्वप्न निवडले हे एक चांगलं काम केले आहे. आता त्यांनी आम्हाला तारखा सांगाव्यात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर आता भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करून काही उदाहरणे दाखवत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

गांधी कुटुंब मागासवर्गीय समुदायातील लोकांना विरोध करते 

भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी सन २०१० मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत प्रणव मुखर्जी यांना लिहिलेले एक पत्र अमित मालवीय यांनी एक्सवर शेअर केले आहे. हे पत्र शेअर करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये अमित मालवीय म्हणतात की, ऑगस्ट २०१० च्या एका पत्रावरून असे दिसून येते की भाजपाने विरोधी पक्षात असताना जातीय गणनेला मान्यता दिली होती. परंतु, काँग्रेसने ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले. मुळात गांधी कुटुंब मागासवर्गीय समुदायातील लोकांना विरोध करते.

दरम्यान, आणखी एका पोस्टमध्ये अमित मालवीय म्हणतात की, राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच १८ सप्टेंबर २०२४ रोजी ही घोषणा लवकरच होणार असल्याबद्दल सूचित केले होते. २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना सुरू केली, ज्यामध्ये जातीय घटकाचा समावेश होता- १९३१ नंतर करण्यात आलेला हा पहिलाच असा प्रयत्न होता. विसंगती आणि वर्गीकरणाच्या मुद्द्यांचा हवाला देऊन काँग्रेस जातीचा डेटा जाहीर करण्यात अपयशी ठरली. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच सामाजिक न्यायाचे पालन करत असून, हे पाऊल योग्य दिशेने टाकलेले आहे.

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार