"तभी तो सब मोदी को चुनते हैं..."; भाजपनं 24 साठी लॉन्च केली जबरदस्त कॅपेन थीम! VIDEO बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:59 IST2024-01-25T13:58:22+5:302024-01-25T13:59:09+5:30
या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरात नळाने पाणी, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

"तभी तो सब मोदी को चुनते हैं..."; भाजपनं 24 साठी लॉन्च केली जबरदस्त कॅपेन थीम! VIDEO बघाच
भारतीय जनता पार्टीने आगामी (2024) लोकसभा निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लॉन्च केले आहे. याला 'सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।' असे शीर्षक देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरात नळाने पाणी, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुण मतदारांसोबत संवाद साधताना म्हणाले, ते आपल्या मताच्या माध्यमाने देशाची दिशा आणि दशा ठरवणार आहेत. युवा मतदारांसोबत बोलताना मोदी म्हणाले, 'स्थीर सरकार मोठे निर्णय घेत असते, आमच्या सरकारने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले मुद्दे सोडवले. 10-12 वर्षांपूर्वी जी स्थिती होती, त्यांनी देशातील युवा वर्गाचे भविष्य अंधकारमय केले.''
#WATCH | BJP launches new campaign for the upcoming Lok Sabha elections 2024 - ‘Modi ko chunte hain’ pic.twitter.com/bblzdEMDDY
— ANI (@ANI) January 25, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्यूअल माध्यमाने युवावर्गाला संबोधित केले. ''भूतकाळात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या हेडलाइन असायच्या. आता चर्चा विश्वसनीयता आणि यशोगाथेच्या होत आहेत. तुमची स्वप्नं, माझा संकल्प आहे, ही मोदीची गॅरंटी आहे."