शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठेच्या मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने या नेत्याला दिली उमेदवारी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:27 IST

Milkipur Assembly By-Election: भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. येथे समाजवादी पक्षाने अजित प्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपानेही येथे आपल्या उमेदवारी घोषणा करताना चंद्रभान पासवान यांना उमेदवारी दिली आहे. येथील आमदार अवधेश प्रसाद यांनी लोकसभा निवडणुकीत फैजाबाद लोकसभा मतदारंघातून विजयी झाल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अयोध्येचा समावेश होणाऱ्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी येथून सनसनाटी विजय मिळवला होता. तसेच हा निकाल देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला होता. अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर काही महिन्यांतच झालेल्या या पराभवामुळे भाजपावर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यामुळे आता मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल, तर मिल्कीपूरची जागा राखत आपली ताकद दाखवून  देण्याचं आव्हान समाजवादी पार्टीसमोर असेल.

मिल्किपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० तारखेपासून सुरू झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी आहे. खरमास असल्याने आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. आता संक्रातीच्या सणासोबतच उत्तरेतील खरमास समाप्त झाल्याने १५ तारखेपासून उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार उतरवलेला नाही. काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर बसपानेही उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिल्कीपूरमध्ये समाजवादी पक्ष आणि भाजपामध्ये थेट लढत होताना दिसेल. तसेच जातीय समिकरणं पाहायची झाल्यास मिल्कीपूरमध्ये पासी विरुद्ध पासी अशी लढत यावेळी पाहायला मिळेल. भाजपा उमेदवार चंद्रभान पासवान हे पासी समाजातील असून, ते रुदौली येथून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. सध्या त्यांची पत्नी सदस्य आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी