शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 12:42 IST

15 सप्टेंबरपासून स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय भाजपानं घेतला आहे. महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटाजवळ वाजपेयी यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्मृती स्थळावर वाजपेयी यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय भाजपानं घेतला आहे. याच ठिकाणी 17 ऑगस्टला वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भाजपाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचं काम 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. या समाधी स्थळाची उभारणी 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 25 डिसेंबरला वाजपेयी यांची 94 वी जयंती आहे. मात्र या भव्य स्मारकाचं बांधकाम पूर्ण करण्यास आणखी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या स्मारकाचं उद्घाटन येत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी वाजपेयी यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात येईल. यानंतर तीनच महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यामुळे याचा राजकीय फायदा भाजपाला मिळू शकतो. या स्मारकामुळे भाजपाला स्वत:चा राजघाट मिळेल. वाजपेयी यांनी त्यांच्या जीवनातील बराच कालावधी दिल्लीतील 6, कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी व्यतित केला. मात्र याठिकाणी वाजपेयींचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार नसल्यानं राष्ट्रीय स्मृती स्थळावरील त्यांची समाधी भाजपाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहून वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय स्मृती स्थळावर येऊ शकतात. मोदी सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रित केलं आहे. मात्र अद्याप अमेरिकेच्या प्रशासनानं हे आमंत्रण स्वीकारलेलं नाही.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान