जातीच्या गणिताचा तोडगा भाजपनं शोधला, दिवाळीनंतर खेळणार 'मास्टरस्ट्रोक'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:09 IST2023-11-02T14:08:25+5:302023-11-02T14:09:03+5:30
Lok Sabha Election 2024 : भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला...!

जातीच्या गणिताचा तोडगा भाजपनं शोधला, दिवाळीनंतर खेळणार 'मास्टरस्ट्रोक'!
जात आणि धर्माचे राजकारण आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. मात्र यात, जातीय राजकारण आपल्या बाजूला वळविण्यासाठी भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रतेशात मस्टरस्ट्रोक खेळणार आहे. खरे तर, भाजपने जातीच्या राजकारणाचा तोडगा शोधला असल्याचे वाटू लागले आहे. कारण भाजप दिवाळीनंतर उत्तर प्रदेशात कॅबिनेटचा विस्तार करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, 2024 च्या निवडणुकीसाठी मिशन 60 ठेवण्याचीही चर्चा सुरू आहे. मिशन 60 चा अर्थ 60 टक्के मतदान मिळवणे असा आहे. 2019 मध्ये हे टार्गेट 50 टक्के एवढे होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत कॅबिनेट विस्तार आणि इतरही काही मुद्द्यांवर सहमती झाल आहे. यानंतर आज, मुख्यमंत्री योगी यासंदर्भात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, आदी नेत्यांसोबत बैठक करू शकतात.
राजभर आणि दारा सिंह चौहान आखणार 'चक्रव्यूह' -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि संघटनेतील आवश्यक बदलांसंदर्भात चर्चा होऊ शकते. मंत्रीमंडळ विस्तारात एसबीएसपी प्रमुख ओमप्रकाश राजभर आणि सपातून भाजपमध्ये आलेले दारासिंह चौहान यांच्यासोबत जातीय जनगणनेचा तोडगा निश्चित होऊ शकतो. याशिवाय, मिशन 60 टक्के टारगेट कशा प्रकारे साध्य करता येईल यावरही चर्चा होऊ शकते.