शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

PM मोदींवरील विधान भोवणार? संजय राऊतांवर FIR दाखल करा; भाजपाची ECकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 10:19 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह गुजरातच्या नागरिकांची विनाअट जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. विशेष करून ठाकरे गटाकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही एका सभेत बोलताना संजय राऊतांनी केलेल्या विधानाला एकप्रकारे पाठिंबा दर्शवत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. याप्रकरणी भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे भाजपाने म्हटले आहे. 

संजय राऊतांवर FIR दाखल करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या नागरिकांची बिनशर्त माफी मागावी. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यासंदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले असून, याची दखल घेण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, महायुतीचे जागावाटप लवकरच निश्चित होऊन उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. संजय राऊतांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग