शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:04 AM

भारतीय सैन्यदलाकडून कुठलेही नवे अस्त्रशस्त्र खरेदी केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाचे भूमीपूजन करताना नारळ, फुले वाहणे, पूजापाठ करणे काही नवी बाब नाही. मात्र...

नवी दिल्ली -  भारतीय सैन्यदलाकडून कुठलेही नवे अस्त्रशस्त्र खरेदी केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाचे भूमीपूजन करताना नारळ, फुले वाहणे, पूजापाठ करणे काही नवी बाब नाही. मात्र फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विमानाच्या पुजनावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे.  राजनाथ सिंह यांनी राफेल विमानावर ओम काढत नारळ ठेवून विमानाची पूजा हा तमाशा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर देत काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि रीतीरिवाजांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच  देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जहाजाचे जलावतरण करताना पूजा करत असतानाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये नेहरू हे नारळ वाढवून जहाजाचे जलावतरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सय्यद अतहर देहलवी यांनी 14 मार्च 2018 रोजी ट्विट केला होता. 14 मार्च 1948 रोजी पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारतातील पहिले जहाज जल ऊषाचे जलावतरण वैदिक मंत्रोच्चार आणि विधिवत पूजा करून केले होते, असा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. दरम्यान, राफेल विमानाच्या पूजेवरून वाद निर्माण झाल्यानंतर सय्यद अतहर देहलवी यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जे काही केले. त्यात नवीन असे काहीच नाही, असा दावा केला आहे.  

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचेही एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये मनमोहन सिंह यांची पत्नी गुरुशरण कौर हातात नारळ पकडून उभ्या आहेत. तसेच त्यांच्या शेजारी नौदलाचे काही अधिकारी उभे आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय संजोजक सरल पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेस भारतीय परंपरांचा किती आदर करते, हे दाखवण्याचा प्रयत्न या छायाचित्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या छायाचित्रासंदर्भात सरल पटेल सांगतात की, " हे छायाचित्र 2009 मधील छायाचित्र असून, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांची पत्नी गुरुशरण कौर यांनी नारळ वाढवून आयएनएस अरिहंतचे उदघाटन केले होते.'' 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेस