शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमित शहांचा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:43 IST

आज राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी केले असून त्यांनी अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अमित शहा यांना नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये स्थान मिळणार की नाही, याबाबत राजकीय चर्चांना ऊत आले होते. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा निवडून आले आहेत. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नवीन कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार आहे. याबाबत गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी अमित शहा यांचा नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे ट्विट करुन त्यांनी अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.

अमित शहा यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास त्यांना भाजपाचे अध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. कारण, भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की, अमित शहा यांनी पार्टीचे अध्यक्ष पद सोडल्यास त्यांच्या जागी जेपी नड्डा किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पार्टीची धुरा सोपविली जाईल. 

दरम्यान, अमित शहा यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पार्टीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी कोणाला आणायचे, हे पार्टीसाठी मोठे अवघड काम आहे. अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पार्टीने सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये विजयाची मोहर उमटवली आहे. अमित शहांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या महानगरपालिका, विधानसभा निवडणुकांपासून लोकसभा निवडणुकांपर्यंत भाजपाने रेकॉर्डतोड प्रदर्शन केले आहे.  

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीBJPभाजपा