शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:26 IST

BJP: चार राज्यांपैकी यूपी, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर आता भाजपने सरकार स्थापनेची तयारी जोरात केली आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्ये भाजपच्या ताब्यात आली आहेत. यूपीमध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही सरकार परतले आहे. गोव्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

अमित शहा यांच्याकडे यूपीची जबाबदारी आहेआता भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी केंद्रीय नेते राज्यांमध्ये पाठवले जाणार असून मंत्र्यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास यांना यूपीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी यांची उत्तराखंडमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मणिपूरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू निरीक्षक म्हणून जाणार आहेत. नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना गोव्यात निरीक्षक बनवण्यात आले आहे. या सर्व राज्यांमध्ये गोवा हे सर्वात महत्त्वाचे राज्य आहे कारण 40 सदस्यांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही, पण 20 जागांसह भाजप नक्कीच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहेगोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र चार दिवस उलटले तरी भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीत 40 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. तीन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) दोन सदस्यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिल्याने भाजप सहज सरकार स्थापन करू शकतो. पण, भाजपमध्ये स्थानिक अंतर्गत वाद असल्यामुळे सर्वांच्याच नजरा गोव्याकडे लागल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंह