आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार? शिवसेनेला जे दिलं नाही, ते 'या' पक्षाला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:41 PM2022-03-31T15:41:41+5:302022-03-31T15:43:32+5:30

मोदी-शाहा-नड्डांची नवी व्यूहनीती; आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याची तयारी

bjp bihar plan nitish kumar to rajya sabha party planning make its cm | आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार? शिवसेनेला जे दिलं नाही, ते 'या' पक्षाला मिळणार

आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार? शिवसेनेला जे दिलं नाही, ते 'या' पक्षाला मिळणार

Next

पाटणा/नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. संयुक्त जनता पक्षाचा मित्र असलेल्या भाजपनं कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याचं समर्थन केलं आहे. 

नितीश कुमार यांना राज्यसभेत जायचं असल्यास त्यांची इच्छा भाजप पूर्ण करेल, असं बिहार भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार हरी भूषण ठाकूर यांनी म्हटलं आहे. अशा स्थितीत राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असंही ठाकूर पुढे म्हणाले. नितीश कुमार यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. सुशासनबाबू अशी ओळख असलेल्या नितीश यांचं सरकार असताना राज्यात दारूबंदीवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच स्थितीचा फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

नितीश कुमार राज्यसभेत गेल्यास बिहारमध्ये भाजप स्वत:चा मुख्यमंत्री बसवेल. २०२० मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला ७४ जागा मिळाल्या. त्यात काही दिवसांपूर्वी व्हिआयपी पक्षाच्या ३ आमदारांची भर पडली. म्हणजे विधानसभेत भाजपचे ७७ आमदार आहेत. तर नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या सदस्यांची संख्या ४३ इतकी आहे. 

२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवलं. एनडीएचा भाग असलेल्या पक्षांमध्ये सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आल्या. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा असावा असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता. आजही भाजपच्या अनेक आमदारांना तेच वाटतं. त्यामुळेच नितीश दिल्लीला जाताच भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करेल.

जेडीयूचे दोन नेते उपमुख्यमंत्री?
नितीश कुमार यांच्या जागी भाजप नेत्याकडे मुख्यमंत्रिपद येईल. सध्या त्यासाठी नित्यानंद राय यांचं नाव आघाडीवर आहे. जेडीयूनं मुख्यमंत्रिपद सोडल्यास त्याबदल्यात त्यांना दोन उपमुख्यमंत्रिपदं दिली जातील. २०१४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. भाजप, शिवसेनेची युती तुटली असल्यानं दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. भाजपला १२२, तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. निकालानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. मात्र भाजपनं त्यांना एकही उपमुख्यमंत्रिपद दिलं नाही. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदच नव्हतं. शिवाय शिवसेनेला कमी दर्जाची खाती दिली गेली.

Web Title: bjp bihar plan nitish kumar to rajya sabha party planning make its cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.