शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:35 IST

Bihar Assembly Election 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने निवडणूक लढविली असली तरी नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील की नाही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, नितीश यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्याची शक्यता कमीच दिसते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची त्सुनामी आली. भाजपने नंबर एकचा पक्ष होऊन विक्रम प्रस्थापित केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयूने जोरदार मुसंडी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने निवडणूक लढविली असली तरी नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील की नाही यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, नितीश यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्याची शक्यता कमीच दिसते.

अमित शाह, जे.पी. नड्डा यांनीही मुख्यमंत्री कोण याबाबत संकेत दिलेला नाही. यासंदर्भात जदयूने ट्विट केले की, “नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील.” मात्र, ही पोस्ट एका तासात डीलीट करण्यात आली. परंतु, असे मानले जाते की भाजपने महाराष्ट्रात जे केले ते बिहारमध्ये करू शकणार नाही; कारण त्यांना इतर प्रमुख राज्यांमध्ये आणि केंद्रातही मित्रपक्षांची आवश्यकता आहे.

सत्ताधारी एनडीएला मोठा विजय मिळाला आहे.  बिहारमधील एनडीए सरकारला सातत्याने सहकार्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मी आभारी आहे. या विजयासाठी एनडीएतील घटक पक्षांचे नेते चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांच्या सहकार्याने बिहार आणखी प्रगती करेल. देशातील सर्वांत विकसित राज्यांमध्ये त्याचा नक्की समावेश होईल.- नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री

नितीश कुमार यांचा ‘पलटू राम’ खेळ आता शक्य नाहीराजकीय निरीक्षकांचे मत आहे की, नितीश कुमार नेहमीचा ‘पलटू राम’ खेळ खेळू शकत नाहीत. महाआघाडीला फक्त ३४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयू ८४ जागांसह बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही. उलट, भाजपच एलजेपी, एचएएम आणि आरएलएम यांच्यासोबत सरकार स्थापन करू शकते. घटनात्मकदृष्ट्या, सर्वांत मोठा पक्ष असल्याने भाजपला प्रथम आमंत्रित करावे लागेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा