भाजपने बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान प्रभारी, सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:39 IST2025-09-25T15:38:39+5:302025-09-25T15:39:53+5:30
बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागा आहेत. एनडीए आणि महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व पक्ष मैदानात प्रचाराला सुरुवात करत आहेत.

भाजपने बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान प्रभारी, सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. राजकीय पक्षांनी त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीसाठी त्यांच्या प्रभारी आणि सह-प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. भाजपने बिहार निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पक्ष नेते धर्मेंद्र प्रधान यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, तर सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयोग ६ ऑक्टोबरच्या सुमारास बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार बिहारला भेट देणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आगमनापूर्वी राज्याला बदली आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागा आहेत. यावेळी राज्यातील निवडणूक एनडीए आणि महाआघाडीमध्ये होणार आहे. निवडणूक घोषणेपूर्वीच सर्व पक्ष मैदानात प्रचाराला लागले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबत असताना २०२० च्या निवडणुकीत विजय मिळवला होता.
यावेळी बिहार निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील लढाई जोरदार होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच विविध राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे.