भाजपच्या 78 उमेदवारांची घोषणा, विधानसभेची पहिली यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:31 IST2019-09-30T17:30:52+5:302019-09-30T17:31:59+5:30
भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी रात्री पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती

भाजपच्या 78 उमेदवारांची घोषणा, विधानसभेची पहिली यादी जाहीर
भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यासोबतच विविध राज्यातील एकूण 62 मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपानेहरयाणातील 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी रात्री पोटनिवडणुकीसाठी 32 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, भाजपाकडून आज हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ताक्षराच्या पत्रावर भाजपाने हरयाणाती अधिकृत 78 उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कर्नाल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
हरयाणातील उमेदवारांच्या यादीत सोनिपत येथून श्रीमती कवित जैन यांना उमेदवारी देण्यातआली आहे.
पुनहाना मतदारसंघातून नौकशाम चौधरी यांना उमेदवार देण्यात आली आहे.