शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:18 IST

या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा (EAC-PM) एक अहवाल समोर आला आहे. यात, गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटल्याचे म्हण्यात आले आहे. या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक रिपोर्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''1950 ते 2015 दरम्यान हिंदूंचा वाटा 7.8% ने कमी झाला. तर मुस्लीम लोकसंख्या 43% ने वाढली. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीत  आपल्यासोबत हेच केले. जर हा देश त्यांच्यासाठी सोडला, तर हिंदूंसाठी एकही देश उरणार नाही.''

केशव प्रसाद मौर्य यांचा निशाणा -उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही वाढती मुस्लीम लोकसंख्या चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणामुळे हे घडले आहे. ते मुस्लीम लीगप्रमाणे वागले आणि त्यामुळेच देशाने हा असमतोल पाहिला. यामुळे समान नागरी संहितेची (UCC) आवश्यकता आहे. या अहवालानुसार, 65 वर्षांत देशातील हिंदू लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43 टक्क्यांनी वाढली आहे. हा काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे.''

अहवालात काय? -इंग्रजी वेबसाइट हिन्दुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (ईएसी-पीएम) देशातील हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येशी संबंधित रिपोर्ट अथवा अहवाल शेअर केला आहे. यात, 1950 ते 2015 दरम्यान गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटली असून मुस्लीम लोकसंख्या वाढली असल्याचे, म्हणण्यात आले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम