"मुलगी झाली म्हणून नवरा मारतो..."; महिलेने पोलिसांना सांगितली डोळे पाणवणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:13 IST2023-09-19T15:12:59+5:302023-09-19T15:13:43+5:30
पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पतीचे मनोधैर्य वाढतच चालल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने प्राणघातक हल्ला केला.

"मुलगी झाली म्हणून नवरा मारतो..."; महिलेने पोलिसांना सांगितली डोळे पाणवणारी गोष्ट
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये एका महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचे म्हणणे आहे की, तिने एका मुलीला जन्म दिला आहे. यावर नवऱ्याचा आक्षेप आहे. तो अत्याचार करतो. विरोध केल्यावर मारहाण करतो. पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. तपासानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हे प्रकरण टेल्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या रुबी या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. मुलीच्या जन्मावर नवऱ्याचा आक्षेप असल्याचं ती सांगते. यामुळे नवरा भांडतो. याबाबत टेल्को पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर तिला महिला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. मात्र, पतीवर कोणतीही कारवाई झाली नाही.
पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पतीचे मनोधैर्य वाढतच चालल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने प्राणघातक हल्ला केला. यानंतर तिने महिला संघटनेशी संपर्क साधून एसएसपी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे वडील एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होते. निवृत्तीच्या वेळी पैसे घेण्याऐवजी जावयाला कामावर ठेवले.
याप्रकरणी महिला पोलिस ठाण्याच्या प्रभारी कुसुम कुजूर यांनी सांगितले की, महिलेने चार महिन्यांपूर्वी लेखी तक्रार दिली होती. पण, तिला एफआयआर नोंदवायचा नव्हता. एखाद्याला जबरदस्तीने पकडून पोलीस ठाण्यात आणणे हा आमचा अधिकार नाही. सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.