शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
3
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
4
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
7
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
8
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
9
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
10
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
11
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
12
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
13
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

बीरभूम : 22 आरोपींविरुद्ध गुन्हा, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 6:37 AM

सीबीआयची कारवाई : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची चौकशी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम हत्याकांडप्रकरणी सीबीआयने २२ आरोपींच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. गेल्या मंगळवारी बोगतुई या गावी सहा महिला व दोन मुलांना काहीजणांनी मारहाण केली व जिवंत जाळले होते. या प्रकरणी राज्य पोलिसांनी २० जणांना या आधीच अटक केली होती. बीरभूम हत्याकांडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अनारूल हुसैन यांची सीबीआयने चौकशी केली.

बीरभूम हत्याकांडात आठजणांना घरात कोंडण्यात आले व घरांना आग लावण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता भादू शेख याचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी बीरभूम हत्याकांड घडविण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्याचीही सीबीआय चौकशी करणार आहे. पोलिसांनी अटक केलेले २० जण व सीबीआयने आरोपी म्हणून तपासकामात नोंदविलेली नावे यात फारसा फरक नाही, असे सूत्रांनी सांगितले. हत्याकांडानंतर बोगतुई गावाला दिलेल्या भेटीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, गुन्हा रोखण्यासाठी पोलिसांना मदत न केल्याच्या आरोपाखाली अनारूल हुसैन यांना अटक केली जाईल. मात्र, सीबीआय हुसैन यांची चौकशी करीत असल्याबद्दल प्रश्न विचारताच, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, विरोधकांनी आमच्या विरोधात कट रचला आहे.

बीरभूम हत्याकांडाची चौकशी सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत आहे. सोना शेख या महिलेचे घर जाळण्यात आले होते. हत्याकांडातील बहुतांश लोकांचे मृतदेह याच घरात हाती लागले होते. त्या घराची सीबीआय पथकाने पाहणी केली. 

७ एप्रिलला देणार तपासाचा स्थितीदर्शक अहवालबीरभूम हत्याकांडाबाबत केलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल सीबीआयला ७ एप्रिलपर्यंत कोलकाता उच्च न्यायालयाला सादर करायचा आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश या न्यायालयाने दिले. बीरभूम हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवू नका, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाकडे केली होती. 

टॅग्स :birbhum-pcबिरभूमCrime Newsगुन्हेगारी