शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

Bipin Rawat Helicopter Crash: CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात की घातपात? हवाई दलाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 4:06 PM

Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री Rajnath Singh यांना देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. तसेच जनरल रावत यांच्यासोबत त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. दरम्यान, बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाने तिन्ही सैन्य दलांच्या तपासामधून समोर आलेल्या निष्कर्षाबाबत  ४५ मिनिटांच्या प्रेझेंटेशनमधून ही माहिती दिली आहे. अधिकृतरीत्या या तपास अहवालाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रसारमाध्यमात येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार खराब हवामानामुळे त्यादिवशी हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.

८ डिसेंबर रोजी झालेल्या त्या भीषण अपघातात सीडीएस रावत आणि १३ इतर व्यक्तींचा मृत्यू झाला होता. खराब हवामान हे हेलिकॉप्टर अपघाताचे मुख्य कारण असल्याची माहिती अहवालात नमूद आहे, असे माध्यमांमधून सांगण्यात येत आहे. तपार पथकाने नमूद केल्यानुसार एमआय-१७, व्ही-५ हे हेलिकॉप्टर विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान हे चालवत होते. तसेच दुर्घटनेपूर्वी ८ मिनिटे आधी त्यांनी हेलिकॉप्टर लँड करत असल्याचा संदेश दिला होता. ते जमिनीपासून खूप कमी उंचीवरून हेलिकॉप्टर नेत होते. जमिनीपासून ५०० ते ६०० मीटर उंचावर असताना त्या दिवशी हेलिकॉप्टरच्या चारी बाजूंना ढगांचे दाट आच्छादन होते. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती.

रिपोर्टनुसार विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान हे रेल्वे लाइनला फॉलो करत हेलिकॉप्टर उडवत होते. तसेच त्यांना वेलिंग्टनमध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये उतरायचे होते. तिथे रावत हे लेक्चर देणार होते. अखेरचा  संवाद अपघातापूर्वी ८ मिनिटे आधी रेकॉर्ड केला गेला. दरम्यान, तपास अहवालामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड किंवा नुकसानीची शक्यता नाकारण्यात आली आहे, असेही माध्यमांमधून सांगण्यात येत आहे.

सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, भारतीय हवाई दलाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ४५ मिनिटांपर्यंत रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेबाबत प्रेझेंटेशन दिले आहे. तिन्ही सैन्यदलांच्या तपास अहवालामध्ये अपघाताचे कारण नमूद करतानाच भविष्यात व्हीआयपींना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. तपास पथकाने सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरबाबतच्या एसओपीमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांनी एएनआयला सांगितले की, त्या दिवशी एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर पर्वतावरून एक रेल्वे ट्रॅक पाहत पुढे जात होते. त्याचदरम्यान ढगांच्या दाट आवरणात येऊन या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाRajnath Singhराजनाथ सिंहindian air forceभारतीय हवाई दल