शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

बायोस्कोप

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

मी स्टोरी टेलर, अर्थ तुम्ही काढा

अहमदनगर : कुटंुब व्यवस्था टिकावी यासाठी चांगला सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज आहे़ पती-पत्नी यांच्यातील वादानंतर अनेक कायद्यांचा आधार घेऊन खटले दाखल केले जातात़ काही प्रकरणात सत्यता तर काही खोटे प्रकरणेही समोर येतात हे टळण्यासाठी काही कायद्यांबाबत पुनर्विचार होणे गरजेचे आहे़ असे मत ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड़ उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले़ पुरुष हक्क संरक्षण समितीच्यावतीने आयोजित १७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ॲड़ वारुंजीकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले़ यावेळी ते बोलत होते़ उद्योजक बाळासाहेब पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ यावेळी समितीचे राष्ट्रीय सचिव धर्मेंद्र चव्हाण, तेजस्वीनी मरोड, ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर, समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष मधुकर भिसे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते़ ॲड़ वारुंजीकर म्हणाले की, कायद्यामध्ये सतत दुरूस्ती होत असते़ मात्र, कायद्याची निर्मिती होत असताना त्यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे़ विधीमंडळात पुरुषांबाबत निर्माण होणार्‍या कायद्याबाबत पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष ठेवून त्यामध्ये वेळीच दुरुस्त्या सुचविणे गरजेचे आहे़ जसे महिलांवर अन्याय अत्याचार होतात़ त्याचप्रमाणे अनेक पुरुषही अत्याचाराचे बळी ठरत असतात़ त्याचे खटले जलदगतीने निकाली निघावेत यासाठी पाठपुरवा झाला तर अनेकांना न्याय मिळेल़ ज्या व्यक्तीची कलम ४९८ मधून निर्दोष मुक्तता झाली आहे़ त्यांना पुढील न्यायालयीन लढाईसाठी समितीने मदत करावी,असे सांगत वारुंजीकर म्हणाले की, अत्याचाराचे बळी ठरणारे गरजू पुरुषांसाठी समितीने मार्गदर्शन करावे तसेच महिला आणि पुरुषांनीही हक्काबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असे ते म्हणाले़
समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड़ शिवाजी कराळे यांनी प्रस्ताविकातून पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका आणि कार्य स्पष्ट केले़ यावेळी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, धर्मेंद्र चव्हाण गोपाळ मिरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले़ शशिकांत नजन यांनी सूत्रसंचालन केले़
चौकट- अधिवेशनात रविवारी कुटुंब व्यवस्था दुभंगण्यास जबाबदार कोण?, पुरुषांचे हक्क आणि कायदेशीर कर्तव्य, स्त्रियांनी कशी लावली संसाराची वाट या विषयांवर चर्चासत्र होणार आहे़ तसेच उपस्थितांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे़
फोटो आहे़