शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:32 IST

Bijapur Naxal Encounter: गेल्या चोवीस तासात १२ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

Bijapur Naxal Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी (१२ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यासोबतच, गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांना मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. यापूर्वी, गुरुवारी गरियाबंद जिल्ह्यात १० नक्षलवादी मारले गेले होते.

बिजापूर जिल्ह्यातील नैऋत्य भागात माओवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान, सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत २ माओवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. तसेच, घटनास्थळावरून ३०३ रायफल आणि इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे असून, ते पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

आतापर्यंत २४३ नक्षलवादी मारले गेलेगरियाबंद चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) चा वरिष्ठ नेता आणि केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) मोडेम बालकृष्ण उर्फ ​​भास्कर याचाही समावेश आहे. भास्करवर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. रायपूर प्रदेशाचे पोलिस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी मैनपूर भागात झालेल्या चकमकीत किमान १० नक्षलवाद्यांना ठार मारले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकीत २४३ नक्षलवादी मारले गेले आहेत. जानेवारीमध्ये गरिबंदच्या मैनपूर भागात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले होते. तर, गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले. सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच अनुषंगाने ही कारवाई केली जात आहे.

अमित शाह काय म्हणाले?गरियाबंदच्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "आज आपल्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो, छत्तीसगड पोलिस आणि डीआरजी यांनी संयुक्त कारवाईत १० कुख्यात नक्षलवाद्यांना ठार मारले. उर्वरित नक्षलवाद्यांनीही वेळेत आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्यांनाही असेच मारले जाईल." 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस