बिहारचा रणसंग्राम, दुस-या टप्प्यातील मतदान सुरु

By admin | Published: October 16, 2015 10:31 AM2015-10-16T10:31:02+5:302015-10-16T10:31:14+5:30

बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांमध्ये ११ टक्के मतदान झाले आहे.

Bihar's Ranigram, second phase polling started | बिहारचा रणसंग्राम, दुस-या टप्प्यातील मतदान सुरु

बिहारचा रणसंग्राम, दुस-या टप्प्यातील मतदान सुरु

Next

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १६ - बिहार विधानसभेसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांमध्ये ११ टक्के मतदान झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्रि जितनराम मांझी यांच्यासह ४५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

बिहार विधानसभेतील २४३ पैकी ३२ मतदार संघांमध्ये शुक्रवारी मतदान होत असून हे सर्व मतदार संघ नक्षलवादग्रस्त आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर तातडीने हे यंत्र बदलण्यात आले. तर बाराचट्टी येथील एका मतदान केंद्रावर मतदारांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी इमामगंज येथे सीआरपीएफच्या एका जवानांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मतदान निर्विघ्न पार पडावे यासाठी निमलष्करी दल व राज्य पोलिसांच्या ९९३ कंपन्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ड्रोन, हेलिकॉप्टरच्या आधारे मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली जात आहे. शुक्रवा 

दुस-या टप्प्यात ८६ लाख १३ हजार ८७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी, विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी, माजी मंत्री जयकुमार सिंह आदी महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्यही आजच ठरणार आहे. 

Web Title: Bihar's Ranigram, second phase polling started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.