बापरे! मोबाईलच्या दुकानात बॅटरीचा स्फोट; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 16:41 IST2021-07-10T16:40:54+5:302021-07-10T16:41:06+5:30
बॅटरी बदलण्यासाठी मोबाईल उघडताच बॅटरीचा स्फोट; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड

बापरे! मोबाईलच्या दुकानात बॅटरीचा स्फोट; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
भोजपूर: मोबाईल वापरताना, दुरुस्त करताना काळजी घ्यायला हवी. मोबाईल दुरुस्त करताना केलेला बेजबाबदारपणा अंगाशी येऊ शकतो. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातल्या नवादामध्ये असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात असाच एक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यानं दुकानदारानं फोन उघडून बॅटरी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात बॅटरीला आग लागली आणि स्फोट झाला.
मोबाईलच्या दुकानात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मोबाईल उघडताच त्यातल्या बॅटरीचा स्फोट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. स्फोट होताच तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले. दुकानदारानं योग्य वेळी मोबाईल खाली टाकल्यानं वित्तहानी टळली. नवादा चौकात असलेल्या सभ्या एंटरप्रायझेसमधील आहे. रेडमी वाय २ मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी एक ग्राहक दुकानात आला होता. दुकानदारानं बॅटरी बदलण्यासाठी मोबाईल उघडताच बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली.
एका ग्राहकाच्या मोबाईलची बॅटरी खराब होती. ती बदलण्यासाठी मोबाईल उघडताच अचानक लाग लागल्याची माहिती सभ्या एंटरप्रायझेसच्या मनीष कुमार यांनी दिली. बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत बिलाची प्रत जळाली. याशिवाय दुकानदाराचं शर्टदेखील काही प्रमाणात जळालं. दुकानात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं दुकानदारानं सांगितलं.