शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:13 IST

काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख  ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. 

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालाने सर्वच विरोधी पक्षांना जोरदार झटका दिला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएने बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवले आहे. एनडीने १९८ जागा पटकावल्या आहेत. त्यात ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या निवडणुकीत अवघ्या ३३ जागांवर महाआघाडीला समाधान मानावे लागले आहे. परंतु मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष बिहारमध्ये नंबर वन बनला आहे. आरजेडीला सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते बिहारमध्ये पडली आहेत.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आरजेडी सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष बनला आहे. आरजेडीला या निवडणुकीत २३ टक्के मते म्हणजेच १ कोटी १५ लाख ४६ हजार ५५ मते मिळाली आहेत. मात्र अवघ्या २५ जागा आरजेडीच्या पारड्यात पडली आहेत. आरजेडीनंतर भाजपाला २०.८ टक्के मते मिळाली आहेत. भाजपाने या निवडणुकीत १ कोटी ८१ हजार १४३ मते घेतली आहेत. त्यानंतर जेडीयूला १९.५ टक्के मते म्हणजेच ९६ लाख ६७ हजार ११८ मते मिळाली आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख  ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. 

आरजेडीवर जातीयवादाचा आरोप

आरजेडीने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे. या व्होटबँकेच्या भरवशावर पक्षाने १४४ जागांपैकी ५२ तिकिटे केवळ यादव समाजाला दिल्याने ‘यादव राज’ पुन्हा येणार हा भाजपाचा संदेश सर्व थरापर्यंत गेला. परिणामी बिगर यादव, मागास, अतिमागास जाती आरजेडीपासून दूर गेला. आरजेडीने काँग्रेस, डावे पक्ष व अन्य छोट्या पक्षांना जागावाटपात किंमत दिली नाही. आपला पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे, असे आरजेडीने सतत ठसवल्याने महाआघाडीची एकूण रणनीती विस्कळीत झाली. काँग्रेसने गॅरंटी जाहीरनाम्यावर तर तेजस्वीने सरकारी नोकरभरतीवर भर दिला याने मतदार संभ्रमित झाला. महाआघाडीच्या एकूण प्रचारात तेजस्वीची छायाचित्रेच झळकत होती. त्यात राहुल गांधी किंवा अन्य मित्र पक्षांचे नेते अभावाने आढळत होते.  

दरम्यान, तेजस्वी सुरुवातीपासून प्रचार भाषणात आपले वडील लालू प्रसाद यांचा वारसा सांगत होते. ही मोठी राजकीय चूक ठरली. कारण यामुळे भाजपाचे नेते लालू व राबडी देवी यांच्या काळातील गुंडगिरी, खंडणी अशा घटनांची उदाहरणे जागोजागी भाषणात देण्यास मोकळे झाले. गोपालगंज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तेजस्वी हे लालूंनी केलेले पाप लपवत’ असल्याचा आरोप केला. त्यामुळे तेजस्वी यांचा ‘सामाजिक न्यायाचा’ अजेंडा सपशेल अपयशी ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : RJD Tops Bihar with Most Votes; BJP-JDU Lag Behind

Web Summary : Despite NDA's Bihar victory, RJD secured the most votes. RJD got 1.15 crore votes (23%), followed by BJP's 1.08 crore (20.8%) and JDU's 96.67 lakh (19.5%). Accusations of RJD's caste-based politics and focusing on Lalu's legacy hurt them.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग