तुमचे उत्तर समाधनकार नाही, बजेटचे पैसे कुठे गेले? मैथिली ठाकूरांचा मंत्र्यांच्या उत्तरावर संताप, विरोधकांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:23 IST2026-02-10T11:22:20+5:302026-02-10T11:23:28+5:30

मैथिली ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाची व्यथा मांडताना सभागृहाचे लक्ष वेधले.

Bihar Maithili Thakur confronts Health Minister over crumbling hospital buildings | तुमचे उत्तर समाधनकार नाही, बजेटचे पैसे कुठे गेले? मैथिली ठाकूरांचा मंत्र्यांच्या उत्तरावर संताप, विरोधकांकडून कौतुक

तुमचे उत्तर समाधनकार नाही, बजेटचे पैसे कुठे गेले? मैथिली ठाकूरांचा मंत्र्यांच्या उत्तरावर संताप, विरोधकांकडून कौतुक

Maithili Thakur: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्यामुळे गाजत आहे. मैथिली ठाकूर यांनी सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात बिहारमधील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. "कागदावर सर्व आलबेल आहे, पण जमिनीवर मात्र वास्तव भयावह आहे," अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाच्या लेखी उत्तराचा समाचार घेतला.

रुग्णालय आहे की मृत्यूचा सापळा?

मैथिली ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाची व्यथा मांडताना सभागृहाचे लक्ष वेधले. "रुग्णालयाची इमारत इतकी कमकुवत झाली आहे की, कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. छताचे प्लास्टर सतत पडत आहे, भिंतींना मोठ्या भेगा गेल्या आहेत आणि पावसाळ्यात वॉर्डमध्ये पाणी साचते. अशा जीवघेण्या परिस्थितीत गर्भवती महिला आणि लहान मुलांवर उपचार केले जात आहेत. हे लोकांच्या जीवाशी खेळणे नाही का?" असा सवाल मैथिली ठाकूर यांनी केला.

सरकारी उत्तरावर मैथिलींचा नो बॉल

सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले होते की, रुग्णालयाची इमारत फारशी खराब नाही, तिला फक्त डागडुजीची गरज आहे. यावर मैथिली ठाकूर यांनी कडाडून प्रहार केला. त्या म्हणाल्या, "मी या उत्तराने समाधानी नाही. मी स्वतः डोळ्यांनी तिथे जाऊन पाहिले आहे. एका छोट्या खोलीत आरोग्य सेवा सुरू आहेत. तिथे एकही एमबीबीएस डॉक्टर नाही. आधी दोन होते, तेही आता नाहीत. मग दरवर्षी वाढणाऱ्या आरोग्य बजेटचा पैसा जातो कुठे?"

आरोग्यमंत्र्यांना भावनिक साद 

आपल्या भाषणादरम्यान मैथिली यांनी काहीसा भावूक सूरही लावला. "मी लहान असल्यापासून आरोग्यमंत्र्यांना कामाताना पाहतेय, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण आदर एका बाजूला आणि जनतेचे प्रश्न दुसऱ्या बाजूला. माझी कळकळीची विनंती आहे की, एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने नवीन इमारत बांधावी," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

सभागृहात खडाजंगी; सत्ताधारी अस्वस्थ

मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक पवित्रा पाहून विरोधकांनी बाके वाजवून त्यांना पाठिंबा दिला, तर सत्ताधारी पक्षाचे नेते काहीसे अस्वस्थ दिसले. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, अनेक कमकुवत इमारतींची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, मैथिली यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून केवळ यादीतच आहे, प्रत्यक्ष कामाला अजून मुहूर्त मिळालेला नाही.

तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीवरही भाष्य

पहिल्यांदाच विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या मैथिली ठाकूर यांनी यावेळी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरही भाष्य केले, ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
 

Web Title : मैथिली ठाकुर ने अस्पताल की हालत, बजट आवंटन पर सरकार को घेरा।

Web Summary : विधायक मैथिली ठाकुर ने विधानसभा सत्र में जर्जर अस्पताल की स्थिति पर बिहार सरकार की आलोचना की, बजट आवंटन पर सवाल उठाया और तत्काल कार्रवाई की मांग की। विपक्ष का समर्थन।

Web Title : Maithili Thakur slams government over hospital conditions, budget allocation.

Web Summary : MLA Maithili Thakur criticizes Bihar government over dilapidated hospital conditions during assembly session, questioning budget allocation and demanding immediate action. Opposition supports her concern.