व्हिडीओमुळे पोलीस अधिकाऱ्याला मसाज पडला महागात, झाले निलंबित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 11:00 IST2018-10-19T10:59:30+5:302018-10-19T11:00:01+5:30
बिहार येथील कैमूरमध्ये गेल्या 24 तासांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी मसाज करुन घेताना दिसत आहेत.

व्हिडीओमुळे पोलीस अधिकाऱ्याला मसाज पडला महागात, झाले निलंबित!
कैमूर : बिहार येथील कैमूरमध्ये गेल्या 24 तासांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी मसाज करुन घेताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर समजले की, हा व्हिडीओ जिल्हातील चैनपूर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ उप अधिक्षक जफर इमाम यांचा आहे.
व्हिडीओमध्ये वरिष्ठ उप अधिक्षक जफर इमाम पोलीस स्टेशनमध्ये काम करतेवेळी एका व्यक्तीकडून मसाज करुन घेत आहेत. तसेच, यावेळी जफर इमान काही फिर्यादींची तक्रार नोंदवून घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, वर्दीत असताना ते मजाज करुन घेत आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जफर इमाम यांना निलंबित करण्यात आले आहे. कैमूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय प्रसाद यांनी सांगितले की, या घटनेमुळे समाजात पोलिसांची बदनामी होत आहे. त्यामुळे जफर इमाम यांच्याकर कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.