बाबो! भाचीच्या प्रेमात वेडी झाली मामी, पळून जाऊन केलं लग्न; ३ वर्षे सुरू होतं अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:41 IST2024-08-12T17:34:26+5:302024-08-12T17:41:26+5:30

मामीने आपल्या भाचीवरच्या प्रेमापोटी पतीला सोडलं. त्यानंतर पळून जाऊन भाचीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

bihar gopalganj two women got married video viral | बाबो! भाचीच्या प्रेमात वेडी झाली मामी, पळून जाऊन केलं लग्न; ३ वर्षे सुरू होतं अफेअर

फोटो - आजतक

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीने आपल्या भाचीवरच्या प्रेमापोटी पतीला सोडलं. त्यानंतर पळून जाऊन भाचीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिली. तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा गावात ही घटना घडली आहे.

बेलवा येथील रहिवासी असलेल्या मामी आणि भाचीने आपल्या सर्व नातेवाईकांचा विचार न करता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केलं आहे. मंदिरात लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. यावेळी दोघींनी एकमेकांना हार घातला. गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सप्तपदी घेऊन सात जन्म सोबत राहण्याचं वचन दिलं. 

भाची शोभाच्या प्रेमात वेडी झालेली सुमन मामी म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे. मला भीती वाटत होती की तिचं दुसरीकडे लग्न झालं तर ती मला सोडून जाईल. फक्त या भीतीपोटी आम्ही दोघींनी सर्व काही सोडून मंदिरात लग्न केलं. तर शोभाने सासमुसा मंदिरात लग्न झाल्याचं सांगितलं.

मामी आणि भाचीचं लग्न हा परिसरात आता चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली. व्हिडीओमध्ये दोघींनीही त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहण्याबाबत सांगितलं आहे.

Web Title: bihar gopalganj two women got married video viral