नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; कुटुंबीयांचं न ऐकता केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:06 PM2024-02-06T12:06:39+5:302024-02-06T12:16:28+5:30

चार मुलांची आई आपल्या चुलत सासऱ्याच्या प्रेमात पडली. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी य़ाला जोरदार विरोध सुरू केला.

bihar gopalganj daughter in law married with her father in law husband had died six months ago | नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासऱ्याच्या प्रेमात पडली सून; कुटुंबीयांचं न ऐकता केलं लग्न

फोटो - अमर उजाला

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. चार मुलांची आई आपल्या चुलत सासऱ्याच्या प्रेमात पडली. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी य़ाला जोरदार विरोध सुरू केला. मात्र दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की दोघांनीही एकत्र जगण्याची किंवा मरण्याची शपथ घेतली. रविवारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. जिथे पोलिसांनी समाजातील लोकांना समजावून या दोघांचं लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघेही आनंदाने आपापल्या घरी गेले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.

सहा महिन्यांपूर्वी झाला पतीचा मृत्यू 

भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबवलिया गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याची पत्नी सीमा देवी विधवा झाली. चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही तिच्यावर आली. ती खचली होती. याच दरम्यान, महिनाभरापूर्वी ती चुलत सासऱ्याच्या प्रेमात पडली. 

सीमाच्या कुटुंबीयांचा विरोध 

कुटुंबीयांना हा प्रकार कळताच हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. सीमाच्या कुटुंबीयांचा यासाठी विरोध होता. तर दुसरीकडे सीमा चुलत सासऱ्यासोबतच लग्न करण्यावर खूप ठाम होती. खूप समज देऊनही दोघं ऐकायला तयार नव्हते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

"लग्नामुळे मी खूप आनंदी आहे”

पोलीस ठाण्याच्या परिसरातील मंदिरासमोर लग्न झालं. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांनाही आशीर्वाद देत नवीन आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सीमाने सांगितलं की, लग्नामुळे मी खूप आनंदी आहे. मला नवीन आयुष्य मिळालं आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: bihar gopalganj daughter in law married with her father in law husband had died six months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.