Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:33 AM2020-08-18T08:33:27+5:302020-08-18T08:36:04+5:30

Bihar Flood : जोरदार पावसाचा फटका बिहारला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. बिहार कोरोनाशी लढत असतानाच सध्या पुराचा देखील सामना करत आहे.

bihar flood picture of woman feet goes viral | Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

googlenewsNext

पाटणा - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे अनेक राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसाचा फटका बिहारला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. बिहार कोरोनाशी लढत असतानाच सध्या पुराचा देखील सामना करत आहे. रिपोर्टनुसार, बिहारमधील एकूण 16 जिल्ह्यांमधील 75 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. या पुरामुळे आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

काही ठिकाणी नद्यांमधील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी आहे. लोक कसाबसा आपला जीव वाचवत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एका महिलेच्या पायांचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो दरभंगा येथील कुशेश्वरस्थान येथील आहे असल्याचा दावा केला जात आहे. बिहारचा पुरातील हा बोलका फोटो सर्वांचंच मन हेलावून टाकत आहे. पायांचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. 

ट्विटरवर आदित्य झा नावाच्या एका युजरने हा फोटो शेअर केला आहे. 'हे पाय बिहारच्या पुरात राहणाऱ्या महिलेचे आहेत. ठिकाण- कुशेश्वरस्थान, दरभंगा. फोटो- सत्यम.' असं कॅप्शनही या फोटोला देण्यात आलं आहे. त्यानंतर हा फोटो अनेकांनी शेअर केला आहे. यात माजी खासदार शैलेशकुमार मंडल यांचाही समावेश आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. फोटो पाहून सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आले आहे. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुराबाबत दिलेल्या माहितीनुसार, या पुरात आतापर्यंत एकूण 69 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आतापर्यंत एकूण 5 लाख 47 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मदत शिबीराचे सात कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. यांमध्ये 12 हजार 489 लोकांना आश्रय देण्यात आला आहे. तसेच बिहार राज्यात पुरामुळे एकूण 9 लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका

CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय

CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ

Web Title: bihar flood picture of woman feet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.