"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:21 IST2025-10-31T14:20:02+5:302025-10-31T14:21:29+5:30
इंडिया आघाडीचे लोक विकासात अडथळे निर्माण करतात आणि गरीबांच्या योजनांवर डल्ला मारतात. हे लोक गरीबांचे राशन हिसकावतील आणि नोकरीच्या नावाने आणखी जमिनी हडपतील. विकासाच्या नावावर माफियाराज आणून बिहारमध्ये नंगानाच करतील.”

"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशात बुलडोझरच्य सहाय्याने चिरडून माफियांना जहन्नुममध्ये पाठवण्यात आलं, असे म्हणज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमधील माफियांवर जोरदार हल्ला चढवला. ते बिहार विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिवान येथे एनडीए उमेदवार मंगल पांडेय यांच्या समर्थनार्थ जनसभेला संबोधित करत होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, परवा रघुनाथपूर येथे आलो होते, कारण तिथे पुन्हा एकदा एक खानदानी माफिया कब्जा करण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही उत्तर प्रदेशात बुलडोझरने माफियांना चिरडले आणि त्यांच्यासाठी जहन्नुमचा मार्ग खुला केला. गेल्या 20 वर्षांत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुशासनाची पायाभरणी झाली आहे.
विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी म्हटले, “ज्यांनी बिहारची ओळख खराब केली, त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका. ही बिहारच्या अस्मितेची लढाई आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो, भारत तेव्हाच विकसित होईल, जेव्हा बिहार विकसित होईल.” एवढेच नाही तर, काँग्रेस आणि राजदने गरीबांसाठी घरे बांधली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
योगी पुढे म्हणाले, "राजदच्या काळात बिहारच्या युवकांसमोर संकट होते. त्येव्हा जनावरांचा चाराही चोरला गेला. इंडिया आघाडीचे लोक विकासात अडथळे निर्माण करतात आणि गरीबांच्या योजनांवर डल्ला मारतात. हे लोक गरीबांचे राशन हिसकावतील आणि नोकरीच्या नावाने आणखी जमिनी हडपतील. विकासाच्या नावावर माफियाराज आणून बिहारमध्ये नंगानाच करतील.”
एनडीएच्या सरकारमध्ये सीतामढी येथे सीता मंदिर बांधले जात आहे. राम-जानकी मार्ग आम्ही तयार करत आहोत, बहिणींसाठी पहिला हप्ता दिला आहे. आम्ही आधी करतो, नंतर बोलतो. गेल्या 8.5 वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही आणि माफियांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली, असेही योगी म्हणाले. यावेळी, विकसित बिहारसाठी पुन्हा एनडीए सरकारच आवश्यक आहे, असेही योगी म्हणाले.