Bihar Election Results: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाने राज्यात 89 जागा जिंकल्या, तर जदयूच्या वाट्याला 84 जागा आल्या. विशेष म्हणजे, 101 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपाने 88 टक्के स्ट्राइक रेट नोंदवला. मात्र, अनेक जागांवर भाजपाला अत्यल्प मतांनी पराभव स्विकारावा लागला. सीमांचल प्रदेशात राजद किंवा काँग्रेस नाही, तर AIMIM च्या प्रभावामुळे पक्षाला धक्का बसला.
12 जागांवर पराभव
भाजपाने 243 सदस्यीय बिहार विधानसभेत 101 जागांवर निवडणूक लढवून 89 जागा जिंकल्या. फक्त 12 जागांवर पक्षाचा पराभव झाला. पराभव झालेल्या जागांमधील 4 जागांवर एक हजार मतांपेक्षा कमी अंतराने पराभव नोंदवला गेला. तर, रामगड सीटवर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने, भाजप उमेदवाराचा फक्त 30 मतांनी पराभव केला. याशिवाय, ढाका सीटवर 178 आणि फारबिसगंजमध्ये 221 मतांनी पराभव स्विकारावा लागला.
सीमांचलमध्ये AIMIM चा प्रभाव
सीमांचलमध्ये मुस्लिम मतदारसंख्या अधिक असल्याने भाजपासाठी हा प्रदेश कठीण मानला जात होता. निकालातही ते स्पष्ट दिसले. या प्रदेशातील एकूण चार जागांवर भाजपाचा पराभव झाला. AIMIM ने येथे पाच जागा जिंकत पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवला. अररिया जिल्ह्यातील फारबिसगंजमध्ये भाजपाचे विद्यासागर केसरी, काँग्रेसचे मनोज विश्वास यांच्याकडून फक्त 221 मतांनी पराभूत झाले. तर, किशनगंजमधील कोचाधामन सीटवर AIMIM च्या सरवर आलम यांनी भाजपाच्या बीना देवी यांना 37,002 मतांनी पराभूत केले. हा या निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवाराचा सर्वात मोठा पराभव ठरला.
या 12 जागांवर भाजपचा पराभव
- मिथिला
- बिस्फी
- सहरसा
- ढाका
- फारबिसगंज
- किशनगंज
- कोचाधामन
- रामगडह
- राघोपुर
- चनपटिया (चंपारण)
- गोह (मगध)
- वारसलीगंज
Web Summary : NDA won Bihar, BJP secured 89 seats, facing close defeats. In Ramgarh, BJP lost by 30 votes. AIMIM impacted Seemanchal, causing BJP losses in four seats. BJP faced defeat on twelve seats overall.
Web Summary : बिहार में एनडीए जीता, बीजेपी को 89 सीटें मिलीं, करीबी हार का सामना करना पड़ा। रामगढ़ में, बीजेपी 30 वोटों से हार गई। एआईएमआईएम ने सीमांचल को प्रभावित किया, जिससे बीजेपी को चार सीटों का नुकसान हुआ। बीजेपी को कुल बारह सीटों पर हार का सामना करना पड़ा।