शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:25 IST

बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे पहिल्यांदाच राजकारणात उतरले होते

मुंगेर - बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघाची या निवडणुकीत जोरदार चर्चा होती. हा मतदारसंघ इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे याठिकाणी माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात रंगत आणली.

याठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. अजय सिंह यांची तिकीट कापून इंडियन इंक्लूसिव्ह पक्षाला दिली होती. याठिकाणी IIP ने नवीन चेहऱ्याला संधी देत नरेंद्र तांती यांना मैदानात उतरवले होते. तर जेडीयूचे बंडखोर आणि माजी मंत्री शैलेश कुमार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी सध्या जेडीयू उमेदवार आघाडीवर आहे तर आयआयपीचे उमेदवार नरेंद्र तांती दुसऱ्या नंबरवर आहेत. 

बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे पहिल्यांदाच राजकारणात उतरले होते. लांडे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे जमालपूर मतदारसंघातील लढत चर्चेत आली होती. जमालपूर मतदारसंघात यंदा राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. जेडीयूने याठिकाणी माजी मंत्र्‍यांचे तिकीट कापून नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर नाराज होऊन माजी मंत्री अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे जेडीयूचा पारंपारिक मतदार कुणाच्या बाजूने कौल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. परंतु जेडीयू उमेदवार सध्या या मतदारसंघातून आघाडीवर आहे. 

कोण आहेत शिवदीप लांडे?

पोलिस सेवेतून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले मराठमोळे शिवदीप लांडे हे IPS अधिकारी होते. मूळ महाराष्ट्रातील अकोल्याचे शिवदीप लांडे हे २००६ बॅचचे बिहार कॅडरमधील सर्वात लोकप्रिय IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी पटना, अररिया, पूर्णिया आणि मुंगेर येथे कार्यरत असताना गुन्हेगारी, माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली होती. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांना ‘सिंघम’, ‘रॉबिन हुड’ 'दबंग' अशा उपाध्या मिळाल्या. त्यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी नेहमी तत्पर राहून लोकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली. २०१४ साली त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले, त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, त्यानंतर माझे लग्न झाले असं शिवदीप लांडे यांनी सांगितले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: Shinde Sena Leader's Son-in-Law Trailing; JDU Leads

Web Summary : In Bihar's Jamalpur, Shivdeep Lande, contesting independently, trails. JDU leads, while the IIP candidate is second. Lande, a former IPS officer married to a Shinde Sena leader's daughter, entered politics after retiring from police service, known for his work against crime.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल