पाटणा: विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला असताना भारतीय जनता पक्षाच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. हा विक्रम बंडखोरांच्या बाबतीतला आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या मुख्यालय स्तरावरील ४३ जणांना भाजपनं घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा विचार केल्यास निलंबितांची संख्या आणखी वाढते. भाजपमध्ये पहिल्यांदाच स्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीयूची युती आहे. मात्र जवळपास १८ जागांवर भाजपच्या नेत्यांनी जदयूविरोधात दंड थोपटले आहेत. तर जवळपास डझनभर मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी स्वपक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिलं आहे. भाजपचे अनेक नेते जागावाटपावरून नाराज झाले. भाजप नेते दावा करत असलेले मतदारसंघ जेडीयू आणि अन्य मित्र पक्षांकडे गेल्यानं भाजप नेत्यांनी दुसऱ्या पक्षांची वाट धरत निवडणुकीचं तिकीट मिळवलं.
भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर करताच जवळपास डझनभर इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि स्वपक्षालाच आव्हान दिलं. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपमध्ये यंत्रणा आहे. भाजपच्या नाराज नेत्यांनी इतर पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष त्यांच्याशी संवाद साधतो. पक्षाचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. बिहारमध्येही तसा प्रयत्न झाला. पण बंडखोरांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यामुळे सध्याच्या घडीला तीन डझनहून अधिक नेत्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलं आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Before Bihar Election Result 2020 BJP Make A New Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.