शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:33 IST

Bihar Election Politics: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली.

- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वयंघोषित ‘हनुमान’ चिराग पासवान ‘रुसून’ बसल्यामुळे रालोआतील जागावाटपाचा मुद्दा रेंगाळत चालला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, प्रभारी महासचिव विनोद तावडे, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे चिराग पासवान यांची समजून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. परंतु, लोक जनशक्ती पार्टीचे (आर) चिराग पासवान आपल्या मागण्यांवर अडून बसल्यामुळे रालोआत जागा वाटपाची चर्चा सुरू होऊ शकली नाही. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी ४० जागांची मागणी केली आहे. भाजपला मात्र ते मान्य नाही.

हिशेब चुकता करायचा आहेमुख्यमंत्री नितीशकुमार यांना जुना हिशेब बरोबर करायचा आहे. २०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उतरविले होते. नितीशकुमार यांना परतफेड करायची आहे. लोजपाला जादा जागा सोडाव्या लागल्या तर त्या भाजपने आपल्या कोट्यातून सोडाव्यात. जेडीयू एकही जागा कमी करणार नाही, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. 

मतदारसंघाबाबत तडजोड नाहीमहत्त्वाचे म्हणजे, लोजपाला थोड्या जागा कमी मिळाल्या तरी चालतील. मात्र, आवडीच्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा समझोता करायला पासवान तयार नाहीत.लोजपाच्या यादीत काही असे मतदारसंघ आहेत, जेथे रालोआतील घटक पक्षांचे आमदार आहेत. यातही चिराग पासवान भाजप नेत्यांशी चर्चा करण्याचे टाळत असल्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. यामुळे भाजप नेते भाजप नेते सतत त्यांची भेट घेत आहेत.

माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लढणार निवडणूकबिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी बिहार निवडणुकांमध्ये दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी जमालपूर आणि अररिया या दोन विधानसभा मतदारसंघांतून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी एप्रिल २०२४ मध्ये स्थापन केलेली ‘हिंद सेना’ ही राजकीय पार्टी अद्याप निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत झालेली नाही. लांडे यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Chirag's Discontent Stalls NDA Seat Sharing in Bihar Elections

Web Summary : Chirag Paswan's demands for 40 seats are delaying NDA's Bihar seat-sharing. Nitish Kumar seeks payback for 2020. Paswan insists on preferred constituencies, creating tension. BJP leaders are trying to mediate.
टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार