Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:02 IST2025-11-16T13:00:26+5:302025-11-16T13:02:21+5:30
Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे.

Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत संजय यादव आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलली. मी ढसाढसा रडत आई-वडिलांचं घर सोडलं" असं रोहिणी यांनी म्हटलं आहे.
रोहिणी यांनी काल अचानक आपल्या कुटुंबाशी नातं तोडलं आणि कुटुंबापासून वेगळं होण्याची घोषणा करून सर्वांना मोठा धक्का दिला. काही लोकांनी आपल्याला माहेर सोडण्यास भाग पाडल्याचं म्हटलं. रविवारी रोहिणी यांनी सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट केली. "काल, एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं... घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलण्यात आली.

"मला अनाथ करण्यात आलं"
"मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, मी सत्याची साथ सोडली नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला... काल, एक मुलीला तिच्या रडणाऱ्या आईवडिलांना आणि बहिणींना सोडून आली. मला माझं माहेर सोडण्यास भाग पाडललं... मला अनाथ करण्यात आलं... तुम्ही सर्वजण कधीही माझ्यासारख्य़ा या मार्गावर येऊ नये, रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याच घरात जन्माला येऊ नये" असं रोहिणी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर रोहिणी आचार्य यांची ही पोस्ट आली आहे. कालच त्यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासून वेगळं होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे विविध चर्चा जोरदार रंगल्या आहेत. याच दरम्यान, या संपूर्ण वादावर लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.