"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:00 IST2025-11-04T14:59:35+5:302025-11-04T15:00:19+5:30
हिंमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या खास शैलित सभेला संबोधित केले. ते म्हटले, “माझी हिंदी थोडी ढिली आहे, मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो. असाममध्ये कामाख्या माता आहे, तिचा आशीर्वाद या भूमीवरही राहोत. रघुनाथपूर नावच शूभ आहे. ही भूमी देशाच्या पहिल्या राष्ट्रपती राजेंद्र बाबूंची कर्मभूमी आहे.”

"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आसामचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी सीवान येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, स्थानिक आरजेडी उमेदवार ओसामा शहाब यांचे नाव न घेता त्यांची तुलना थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली. सरमा म्हटले, “या देशातील सर्व ‘ओसामा’ एकेक करून संपवायला हवेत. हा राम-सीता यांचा देश आहे, येथे ओसामा बिन लादेनसारख्यांचे वर्चस्व कधीही मान्य होणार नाही.”
हिंमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या खास शैलित सभेला संबोधित केले. ते म्हटले, “माझी हिंदी थोडी ढिली आहे, मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो. असाममध्ये कामाख्या माता आहे, तिचा आशीर्वाद या भूमीवरही राहोत. रघुनाथपूर नावच शूभ आहे. ही भूमी देशाच्या पहिल्या राष्ट्रपती राजेंद्र बाबूंची कर्मभूमी आहे.”
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, “मला वाटले इथे राम-सीता भेटतील. मात्र लोकांनी सांगितले, येथे ओसामा देखील आहे. मी विचारले, तो तर गेला, आता हा कोण? लोक म्हणाले, तसाच लहान ओसामा आहे! यामुळे या निवडणुकीत अशा ओसामाला संपवलेच पाहिजे.”
शहाबुद्दीन नाव घेत सरमा म्हणाले, “वडील शहाबुद्दीन होते. ज्यांने खुनाच्या बाबतीत गिनीज रेकॉर्ड केला होता. जर हे इथेच थांबले नाही, तर संपूर्ण देशभरात पोहोचेल.” ते पुढे म्हणाले, “घुसखोरांना मतदानाचा अधिकार नाही. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी यात्रा काढली, पण बिहारच्या मतदार यादीतून,, असे घुसखोर वगळण्यात आले आहेत.” तसेच, “ जेव्हा देशातील हिंदू जागा होईल, तेव्हा कोणताही ओसामा किंवा औरंगजेब टिकू शकणार नाही.”