बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:44 IST2025-10-25T05:43:20+5:302025-10-25T05:44:12+5:30
७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत.

बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी १३०२ उमेदवार रिंगणात आहेत. २० जिल्ह्यांतून १७६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी १३७२ अर्ज वैध ठरले. ७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
गुरुवारी या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतर आता अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत.
११ ‘मैत्रिपूर्ण’ लढती
एकीकडे महाआघाडीत सारे काही अलबेल आहे असे सांगण्याचा प्रयत्न नेते करीत असले तरी ११ जागांवर आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत. कहलगाव, वैशाली, नरकटियागंज, सिकंदरा, सुल्तानगंज, बछवाडा, राजापाकर, बिहार शरीफ, करगहर, चैनपूर, बेलदौर या मतदारसंघांत ‘मैत्रिपूर्ण’ लढती होतील.