"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:58 IST2025-12-16T13:55:53+5:302025-12-16T13:58:11+5:30
...या घटनेवर आता जायरा वसीमने संताप व्यक्त केला असून, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, नितीश कुमार यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटणा येथील एका कार्यक्रमात व्यासपीठावर एका मुस्लीम महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर आता जायरा वसीमने संताप व्यक्त केला असून, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, नितीश कुमार यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
जायरा वसीम यांचा संताप -
खरे तर, चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली जायरा वसीम सोशल मीडियावरही फार कमीच सक्रिय असते. मात्र, तिचे हे ट्वीट आता जबरदस्त चर्चेत आले आहे. "एका महिलेची प्रतिष्ठा आणि मर्यादा ही खेळण्याची गोष्ट नाही, विशेषतः सार्वजनिक व्यासपीठावर. एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा नकाब एवढ्या निष्काळजीपणे खेचला जाताना बघणे आणि त्यासोबतची ते हास्य बघणे, अत्यंत संतापजनक होते. सत्ता आपल्याला मर्यादेचे उल्लंघन करण्याची परवानगी देत नाही. नितीश कुमारांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागायला हवी," असे ट्विट जायराने केले आहे.
A woman’s dignity and modesty are not props to toy with. Least of all on a public stage. As a Muslim woman, watching another woman’s niqab being pulled at so casually, accompanied by that nonchalant smile, was so infuriating.
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) December 15, 2025
Power does not grant permission to violate…
नेमकं काय घडलं...?
सोमवारी पटना येथे मुख्यमंत्री नितीश कुमार एका नव नियुक्त आयुष डॉक्टरला नियुक्तीपत्र देत होते. ही महिला डॉक्टर हिजाब परिधान करून त्यांच्यासमोर आली. सीएमच्या सचिवालयात झालेल्या या कार्यक्रमात १००० आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
Bihar CM #NitishKumar pulled the veil of a woman while distributing appointment.
— 🦋 Sweta🦋 (@Sweta10t) December 15, 2025
What's your opinion on it ?
Particularly I will say he was scared of the lady being a su!side bomber pic.twitter.com/bwDIXMpZ90
दरम्यान, नुसरत परवीन नावाची एक महिला डॉक्टर चेहऱ्यावर हिजाब लावून व्यासपीठावर पोहोचली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हे पाहताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुसरतला विचारले, हे काय आहे?" आणि लगेचच तिचा हिजाब खेचला होता.