नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 16:07 IST2024-02-12T15:56:29+5:302024-02-12T16:07:28+5:30
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला, विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. मतदानात सरकारच्या बाजूने १२९ मते पडली, तर विरोधात ० मते पडली. पटनामध्ये फ्लोअर टेस्टपूर्वीच राजकीय गोंधळ सुरूच होता. यावेळी बरेच नाट्य पहायला मिळाले. तिथे तीन राजद आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव यांनी कॅम्प बदलून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. तेजस्वी यादव यांनी याला कडाडून विरोध केला आणि परंपरेनुसार त्यांना फक्त त्यांच्या जागेवर बसण्यास सांगितले. यावेळी भाजपचे तीन आमदारही सभागृहात पोहोचले नाहीत, तर जेडीयूचे तीन आमदारही विधानसभेत नव्हते. दुपारी २.३० वाजेपर्यंत सर्व आमदार सभागृहात पोहोचले असले तरी फक्त जेडीयूचे आमदार दिलीप राय पोहोचले नाहीत.
मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. बहुमताचा आकडा १२२ आहे, तर एनडीएकडे १२८ विधानसभा सदस्य आहेत. यामध्ये भाजपला ७८ जागा, जेडीयूकडे ४५ जागा, हिंदुस्थानी अवाम मोर्चा ४ जागा आणि एक अपक्ष आमदार सुमित सिंह देखील आहेत. तर विरोधकांकडे ११४ आमदार आहेत. यामध्ये राजदचे ७९, काँग्रेस १९, सीपीआय १२, माकपचे २, सीपीआयचे २ आमदार आहेत.
गेल्या काही दिवसापासून आरजेडीचे आमदार एकत्र ठेवण्यात आले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधी पक्षातील आमदार फुटू शकतात अशी चर्चा सुरू होती. विधानसभा अध्यक्ष अवध चौधरी यांना पदावरून हटवण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी झाली. राज्यपाल म्हणाले की, जल जीवन हरियालीमध्ये मिशन मोडमध्ये काम केले जात आहे. गया, बोधगया, राजगीर, नवाडा येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आता मॅट्रिकमध्ये मुलींची संख्या मुलांच्या बरोबरीने पोहोचली आहे. बिहारमध्ये शिक्षकांच्या पुनर्स्थापनेमुळे शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
Bihar CM Nitish Kumar's government wins Floor test after 129 MLAs support him. pic.twitter.com/0pclQRL2Vz
— ANI (@ANI) February 12, 2024