शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:59 IST

Bihar Next Chief Minister: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रि‍पदावर आपला माणूस बसवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

Nitish Kumar Bihar Chief Minister News: बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असणार, याबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीएचे सरकार काम करणार आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता राहिली आहे, असे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 

पाटणामध्ये माध्यमांशी बोलताना दिलीप जैस्वाल म्हणाले, "उद्या (१८ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता भाजपच्या कार्यालयातील अटल सभागृहात भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यसभा, लोकसभेतील सर्व खासदार, सर्व आमदार आणि विधान परिषदेचे आमदारही उपस्थित असणार आहे. सर्वांच्या संमतीने सभागृह नेत्याची निवड केली जाणार आहे", अशी माहिती बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी दिली.  

"नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे" 

"आज सायंकाळपर्यंत निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल. भाजपच्या बैठकीनंतर एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. मग त्या बैठकीमध्ये  कायदेशीर प्रक्रियेनुसार सभागृह नेत्याची निवड करणार आहोत", दिलीप जैस्वाल यांनी सांगितले.   

यावर जैस्वाल यांना प्रश्न विचारण्यात आला की, नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार, यात कोणतीही शंका नाहीये ना? त्यावर जैस्वाल म्हणाले की, त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे, फक्त कायदेशीर प्रक्रियेनुसार करायचे आहे. त्यांचीच निवड केली जाणार आहे फक्त औपचारिकता राहिली आहे", असे उत्तर जैस्वाल यांनी दिले.  

भाजपला प्रतिक्षा करावी लागणार

बिहारमध्ये भाजपला अजूनही आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही. यावेळी भाजपने ८९ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण, भाजपने जेडीयूसोबतची मैत्री कायम ठेवत पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नितीश कुमार यांच्या जेडीयूने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकल्या आहेत. पण, भाजपपेक्षा जेडीयूला कमीच जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळीही भाजपने एनडीएमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, निवडणुकीआधीच नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे जाहीर केले होते. यावेळी एनडीएने मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित केलेला नव्हता. त्यामुळेच भाजप वेगळा निर्णय घेऊ शकतो अशी चर्चा सुरू होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar to Remain Bihar CM, BJP Confirms, Ending Speculation

Web Summary : BJP confirmed Nitish Kumar will remain Bihar's Chief Minister, ending speculation. BJP's legislative meeting will formalize the decision. Legal formalities remain before the official announcement. Despite winning more seats, BJP поддержала Kumar's leadership.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा