शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 4:35 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत.

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत. दगडफेकीत नितीश कुमारांच्या ताफ्यातील अनेक सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, नंदर गावातील लोक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना दलित वस्तीमध्ये बोलवण्याची मागणी करत होते. याच मुद्द्यावरून स्थानिक लोक आणि अधिका-यांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त लोकांनी दगडफेक केली होती. ज्यात अनेक सुरक्षारक्षक गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. नंदर गावात अनेक विकासाची कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे लोक नितीश कुमारांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी करत होते. परंतु नितीश कुमार नंदर गावातून निघून गेले आहेत.दोन महिन्यांपूर्वीच एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती मिळाल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरून लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. 'जेडीयूच्या काही नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी कुर्ता - पायजमा शिवून ठेवला होता. पण त्यांना आमंत्रणच मिळालं नाही', अशी खिल्ली लालू प्रसाद यादव यांनी उडवली होती.2010 रोजी भाजपाने डिनरच आमंत्रण देऊनही नितीश कुमार यांनी ते नाकारलं होतं, कारण त्यामध्ये नरेंद्र मोदी सामील होणार होते. तीन वर्षांनी 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आपली 17 वर्षांची युती तोडली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी महाआघाडीतून माघार घेत एनडीएशी हातमिळवणी केली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार