शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खरगेंच्या फोनला नितीश यांचा 'नो रिप्लाय', लालूंनंतर काँग्रेससाठीही 'बिझी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:26 IST

बिहारच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

नवी दिल्ली: बिहारच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड हा राष्ट्रीय जनता दलासोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच माजी मुंख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलताना नितीश यांनी घराणेशाहीवरून टीका केली होती. तेव्हापासून नितीश लालू यादवांच्या राजदपासून दूर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. नितीश पुन्हा एकदा एनडीएचा घटक होणार अशी चर्चा सुरू असताना लालू यादव आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

लालूंपाठोपाठ काँग्रेस देखील सक्रिय झाली असून मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीश कुमारांशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नितीश यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी देखील बिहारच्या मुख्यमंत्र्यांना अनेकदा फोन केला. पण, नितीश यांनी लालूप्रसाद यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन उचलण्यास नकार दिला. त्यांच्या ऑफिसकडून ते इतर कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. 

या प्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी एकदा नव्हे तर अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री व्यग्र आहेत.

नितीश कुमारांचे बाहेर पडण्याचे संकेतमागील काही दिवसांपासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस