Bihar Black Fungus Death: कोरोनानंतर बिहारमध्ये ब्लॅक फंगसमुळे हाहाकार; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:14 PM2021-05-26T12:14:43+5:302021-05-26T12:17:28+5:30

Bihar Black Fungus Death: बिहारमध्ये ब्लॅक फंगसच्या वाढत्या घटनांमुळे त्याला महासाथ घोषित करण्यात आलं. २४ तासांत कोरोनापेक्षाही अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल.

bihar black fungus news 24 hours 12 black fungus patients death coronavirus covid 19 pandemic mucormycosis | Bihar Black Fungus Death: कोरोनानंतर बिहारमध्ये ब्लॅक फंगसमुळे हाहाकार; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू

Bihar Black Fungus Death: कोरोनानंतर बिहारमध्ये ब्लॅक फंगसमुळे हाहाकार; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देबिहारमध्ये ब्लॅक फंगसच्या वाढत्या घटनांमुळे त्याला महासाथ घोषित करण्यात आलं. २४ तासांत कोरोनापेक्षाही अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लागू केलेल्या निर्बंधांनंतर यावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. असं असलं तरी आता ब्लॅग फंगसनं अनेकांच्या चिंता वाढवल्या आहे. बिहारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. परंतु असं असतानाच आता ब्लॅक फंगस या आजारानं प्रशासनासमोरच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत बिहारमध्ये कोरोनापेक्षाही अधिक ब्लॅक फंगसच्या आजाराच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.
 
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत ब्लॅक फंगसमुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ब्लॅक फंगसचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं ब्लॅक फंगससाठी असलेल्या बेड्सची संख्या वाढवली आहे.

महासाथ म्हणून घोषणा

बिहारमध्ये ब्लॅक फंगसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शनिवारी याला महासाथ म्हणून घोषित केलं होतं. "मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सूचनेनुसार एपिडमिक डिजिज अॅक्ट अंतर्गत ब्लॅक फंगस अधिसूचित करण्यात आलं आहे," अशी माहिती आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिली. याअंतर्गत आरोग्य विभागाकडून अनेक सूचना देण्यात आल्या असल्याचे मंगल पांडे म्हणाले होते.

सर्व खासगी आणि सरकारी संस्थांकडून म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) सर्व संदिग्ध आणि प्रमाणित रुग्णांना जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून एकीकृत रोग निवारण कार्यक्रम, आरोग्य विभागाला सूचित केलं जाणार आहे. 

Read in English

Web Title: bihar black fungus news 24 hours 12 black fungus patients death coronavirus covid 19 pandemic mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.