अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:32 IST2023-07-18T12:26:30+5:302023-07-18T12:32:41+5:30

एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावची वीज कापत असल्याची घटना घडली आहे.

bihar bettiah boy friend girl friend village power cut | अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्...

अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्...

बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर येत आहेत. एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावची वीज कापत असल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसारस बेतियाच्या नौतन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावाची वीज खंडित करत होती. 14 जुलै रोजी तिचा प्रियकरही तिला भेटण्यासाठी गेला होता. याच दरम्यान मुलीने वीज खंडित केली होती. गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि नंतर त्या मुलाला बागेत नेऊन बेदम मारहाण केली. 

बॉयफ्रेंडला मारहाण होत असल्याचं पाहून तरुणीचं गावकऱ्यांशी भांडण झालं. बॉयफ्रेंडला मारहाण केल्याचा आणि तरुणीचं गावकऱ्यांशी भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी गावातील लोकांचा कसा सामना करते. याप्रकरणी गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही मुलगी संपूर्ण गावाची वीज खंडित करायची. यानंतर अंधाराचा फायदा घेत तिचा बॉयफ्रेंडला तिला भेटण्यासाठी पोहोचायचा. 

वीज खंडित झाल्यानंतर गावात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गावातील अनेक लोकांच्या मोटारसायकल, सायकली, धान्य व इतर साहित्य गायब होऊ लागले. त्यावेळी गावातील लोक यामुळे जागरुक होते. त्यानंतर दोघांना रंगेहात पकडलं, त्यानंतर त्यांना मारहाण करून व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीचा बॉयफ्रेंड संतापला आणि त्याच्या मित्रांसह गावातील तरुणांचा बदला घेण्यासाठी गेला, ज्यांनी त्याला मारहाण केली. 

गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बॉयफ्रेंडसह तीन तरुणांना ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही बाजुच्या लोकांनी पोलीस ठाणे गाठले. याच दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या प्रियकराने दोघांचं लग्न लावून देण्याबाबत चर्चा केली. या प्रकरणी नौतन पोलीस ठाण्याचे प्रमुख खालिद अख्तर यांनी सांगितले की, हे प्रेमप्रकरण होतं, दोन्ही कुटुंबे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि लग्नाची चर्चा केली, त्यानंतर बॉयफ्रेंडला सोडून देण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bihar bettiah boy friend girl friend village power cut

टॅग्स :Biharबिहार