बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:10 IST2025-10-11T15:08:18+5:302025-10-11T15:10:06+5:30
दरम्यान, पक्षाने माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना सक्रिय केले आहे. ते हा तिढा सोडवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत.

बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्याप महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा काय असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लालू यादव काँग्रेसला 50 हून अधिक जागा देण्यास तयार नाहीत. तसेच, काँग्रेसही काही महत्त्वाच्या जागांवरील आपला हक्क सोडण्यास तयार नाही.
दरम्यान, पक्षाने माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना सक्रिय केले आहे. ते हा तिढा सोडवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत.
काँग्रेसने 70 ऐवजी 57 जागा लढवाव्यात -
गेल्या 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसला 70 जागा मिळाल्या होत्या, तर राजदने 144 जागा लढवल्या होत्या. मात्र, यावेळी राजदने आपला वाटा 144 वरून 138 पर्यंत कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेसने 70 ऐवजी 57 जागा लढवाव्यात, याशिवाय CPI-ML नेही 19 ऐवजी 18 जागांवर निवडणूक लढावी, असा राजदचा फॉर्म्यूला आहे.
मुकेश सहनींच्या 'व्हीआयपी' (VIP) ला 16 जागांचा प्रस्ताव -
यावेळी, महाआघाडीचा विस्तार झाला आहे. मुकेश सहनींची 'व्हीआयपी' (VIP) आता आघाडीत आहे आणि त्यांना 16 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि पशुपति पारस यांच्या 'राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी' (RLJP) ला प्रत्येकी 2-2 जागा देण्याची शक्यता आहे. या नव्या समीकरणामुळे जागावाटपाचे गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.