शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results : गिरिराज सिंहांनी मीम शेअर करत तेजस्वी यादवांना केले 'रन आउट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 10:29 IST

Giriraj Singh : बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देभाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे.

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता सर्वांसमोर आले आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने 122 बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले.

या निवडणुकीत भाजपा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भाजपाच्या विजयाबद्दल आणि आरजेडीच्या पराभवाबद्दल मीम शेअर केले आहे. गिरीराज सिंह यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये तेजस्वी यादव धावचीत होताना दिसत आहे. तसेच,  गिरीराज सिंह यांनी ट्विट करताना या फोटोसाठी 'गुड वन' असे शीर्षक दिले आहे आहे.

दरम्यान, बिहारमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली, ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. काल रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. 

नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार