शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 4:04 PM

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र...

ठळक मुद्देसीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे.बिहारमध्ये केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे.सीमांचलमध्ये एकूण 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे.

पाटणा - नेपाळ आणि पश्चिम बंगालच्या सीमेला लागून इशांन्य भारताला जोडल्या जाणाऱ्या भागाला बिहारमधील सीमांचल भाग म्हणून ओळखले जाते. राजकारणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण येथील पूर्णियामध्ये 35 टक्के, कटिहारमध्ये 45 टक्के, अररियामध्ये 51 टक्के आणि किशनगंजमध्ये 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत. आता जे निवडणूक निकाल समोर येत आहेत, त्यानुसार सीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे. परिणामी येथील या 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे. तर 8 जागा इतरांना मिळत आहेत. यात ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष तीन जागांवर पुढे आहे. 

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीत ओवेसी फॅक्टर एनडीएच्या फायद्याचा ठरत आहे. ओवेसींचा पक्षही महाआघाडी आणि आणि एनडीएला आव्हान देत आहे. गत विधानसभा निवडणुकीचा विचार करता, सीमांचलमधील 19 पैकी 12 जागा आरजेडी आणि काँग्रेसने जिंकल्या होत्या.

Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

या तीन जागांवर एआयएमआयएम आघाडीवर -सध्या ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम अमौर, बहादुरगंज आणि कोचाधामन या तीन जागांवर पुढे आहे. सीमांचलमधील 24 जागांवर, महाआघाडीकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम एका जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर, एनडीएकडून भाजपा 12, जेडीयू 11 तर हम एका जागेवर नशीब आजमावत आहेत.

सीमांचल भागात 2015च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. येथे एकट्या काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला होता. तर जेडीयूने 6 आणि आरजेडीने 3 जागा जिंकल्या होत्या.

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा