लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:35 IST2025-11-15T07:35:13+5:302025-11-15T07:35:26+5:30
Bihar Assembly Election Result: माजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीला (जेएसपी), बिहार निवडणुकीतील ‘एक्स फॅक्टर’ म्हटले जात असले, तरी २४३ सदस्यीय विधानसभेत २३८ जागांवर निवडणूक लढवूनही या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
पाटणा - माजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीला (जेएसपी), बिहार निवडणुकीतील ‘एक्स फॅक्टर’ म्हटले जात असले, तरी २४३ सदस्यीय विधानसभेत २३८ जागांवर निवडणूक लढवूनही या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
जेएसपीच्या बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांपैकी त्यातल्या त्यात उत्तम कामगिरी मरहौरा मतदारसंघातील नवीनकुमार सिंग उर्फ अभय सिंग यांनी केली आहे.
फारबिसगंज मतदारसंघात काय घडले?
राजदचे जितेंद्रकुमार राय यांनी २७,९२८ मतांच्या फरकाने ही जागा जिंकली. त्यानंतर, दुसऱ्या स्थानावर नवीनकुमार होते. बेरोजगारी, स्थलांतर आणि उद्योगांचा अभाव यांसारखे मुद्दे जोरकसपणे मांडूनही जेएसपीला जनतेचा पाठिंबा मिळविता आला नाही. अनेक जागांवर जेएसपीच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली.
फारबिसगंज मतदारसंघातील जेएसपी उमेदवार मोहम्मद इक्बालुल हक यांना केवळ ९७७ मते मिळविली, तर या मतदारसंघात नोटाला ३,११४ मते मिळाली आहेत. ज्या मोजक्या जेएसपी उमेदवारांना १० टक्क्यांहून अधिक मते मिळाली, त्यात युट्युबर त्रिपुरारीकुमार तिवारी उर्फ मनीष कश्यप आणि सरफराज आलम यांचा समावेश आहे. भोजपुरी गायक रितेश पांडे यांनाही आपली छाप पाडता आली नाही.