बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:04 IST2025-09-23T14:02:35+5:302025-09-23T14:04:20+5:30

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होणार आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएमधील घटक पक्षांचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आलं आहे.

Bihar Assembly Election 2025: NDA's seat-sharing formula in Bihar has been decided, this party will contest the maximum seats | बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा

बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा

बिहार विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होणार आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएमधील घटक पक्षांचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एनडीएकडून जेडीयू १०२, भाजपा १०१ आणि एलजेपी (आर) २०, तर हम आणि आरएलएम या पक्षांना प्रत्येकी १० जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जागावाटपामध्ये प्रत्येक पक्षाच्या जागांमध्ये एक दोन जागांची वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी जागांची अदलाबदल होऊ शकते.

एनडीएमधील जागावाटप १० दिवसांमध्ये पूर्ण होईल. तसेच मित्रपक्षांनी केलेल्या सन्मानजनक जागावाटपाच्या मागणीनुसार जागावाटप केलं जाईल, असे, मंत्री संतोष सुमन यांनी सांगितले होते. तसेच पाटणा येथे होणाऱ्या बैठकीवरून काँग्रेसवर टीका केली होती. एका पक्षाच्या मागे मागे चालून काही होणार नाही, याची काँग्रेसला जाणीव झाली आहे. क्रेडित मिळालं तर एकाच पक्षाला मिळेल. जर चिंतन करून काँग्रेसला सदबुद्धी आलं तर मी त्यांचं स्वागत करतो, असा टोलाही सुमन यांनी लगावला.

दरम्यान, हम पार्टीचे नेते आणि केंद्रातील मंत्रीचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी अधिकाधिक जागांची मागणी केली होती. याशिवाय एनडीएमधील इतर पक्षांनीही अधिकाधिक जागांचा आग्रह धरला होता. अशा परिस्थितीत प्रत्येकाची नजर ही जागावाटपावर लागलेली होती. आता या जागावाटपाबाबत एनडीएकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Bihar Assembly Election 2025: NDA's seat-sharing formula in Bihar has been decided, this party will contest the maximum seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.