Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानच्या टक्केवारीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. टक्केवारी वाढल्यामुळे एकीकडे विरोधक विजयाचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बहुमताने विजयाचा दावा केला आहे.
एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल
अमित शाह यांनी आजतकशी संवादात सांगितले की, ही निवडणूक एकतर्फा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागम करणार आहे. याबाबत माज्या मनात कोणतीही शंका नाही की, NDA 160 पेक्षा जास्त जागा जिंकून दोन-तृतीयांश बहुमतासह सत्ता स्तापन करेल. सीमांचल प्रदेशातील किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या मतदानाचा हवाला देत शाह म्हणाले की, महिला, युवक, शेतकरी आणि कामगार सर्वच घटक NDA च्या बाजूने मतदान करत आहेत.
60% पेक्षा जास्त मतदान म्हणजे NDA च्या विजय
शाह पुढे म्हणाले, या निवडणुकीत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे आणि हा आकडा NDA च्या परतीचा स्पष्ट संकेत देतो. जनतेला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. विकासावरच हे मतदान झाले आहे. राजदच्या रोजगाराच्या आश्वासनांवर प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले, ज्यांची सरकार बनण्याची शक्यता नाही, त्यांच्या आश्वासनांना कोण ऐकेल? आश्वासन त्यांचेच ऐकले जाते, जो सत्तेत येणार आहे, असा दावा त्यांनी केला.