सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:38 IST2025-10-19T08:38:22+5:302025-10-19T08:38:22+5:30
या पक्षाने आपल्या १२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी
पाटणा : बिहारमधील इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सीपीआय (एमएल) लिबरेशन या पक्षाने शनिवारी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची यादी जाहीर केली. या पक्षाने आपल्या १२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष ज्या जागा जिंकू शकला नव्हता त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. पक्षाचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांनी सांगितले की, आम्हाला किमान २४ जागा हव्या होत्या. महागठबंधन या निवडणुकांत नक्कीच मोठा विजय संपादन करेल.
खेसारीलाल यादव यांची २४ कोटींची संपत्ती
बिहारमधील सारण जिल्ह्याच्या ‘छपरा’ विधानसभा मतदारसंघातून राजदने उमेदवारी दिलेले भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझी व माझ्या पत्नीची एकूण संपत्ती २४.८१ कोटी रुपयांची आहे. यादव हे प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.